IAF Agniveervayu Recruitment 2024 : भारतीय वायुसेनेमध्ये सध्या ‘अविवाहित’ स्त्री व पुरुष अग्निवीरवायू वादकांची भरती करण्यात येणार आहे. कोणकोणत्या वाद्य वादकांची भरती यावेळेस होणार आहे ते इच्छुक उमेदवारांनी पाहावे. तसेच, या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया याबद्दल माहिती जाणून घ्या.
या भरतीमध्ये A यादीत खालील वाद्य वाजविणाऱ्या उमेदवारांची भरती करण्यात येईल
A यादी –
कॉन्सर्ट बासरी/पिकोलो [Concert Flute/Piccolo]
ओबो [Oboe]
Eb/Bb क्लॅरिनेट [Clarinet in Eb/Bb]
Eb/Bb सॅक्सोफोन [Saxophone in Eb/Bb]
F/Bb फ्रेंच हॉर्न [French Horn in F/Bb]
Eb/C/Bb ट्रम्पेट [Trumpet in Eb/C/ Bb]
Bb/G ट्रॉम्बोन [Trombone in Bb/G]
बॅरिटोन [Baritone]
युफोनियम [Euphonium]
Eb/Bb बास/टूबा [Bass/Tuba in Eb/Bb]
B यादी –
कीबोर्ड/ऑर्गन/पियानो [Keyboard/Organ/Piano]
गिटार [Guitar (Acoustic/Lead/Bass)]
व्हायोलिन, व्हायोला, स्ट्रिंग बास [Violin, Viola, String Bass]
पर्क्यूशन/ड्रम्स [Percussion/Drums (Acoustic/Electronic)]
सर्व भारतीय शास्त्रीय वाद्य
वरील दोन्ही यादींमधील एक-एक वाद्य वाजवता येणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
हेही वाचा : TMC Recruitment 2024 : मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान दहावी किंवा समतूल्य शिक्षण घेतलेले असणे अपेक्षित आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना गाण्याचा टेम्पो, पीच याचे ज्ञान आणि त्यावर प्रभुत्त्व असणे आवश्यक आहे. उमेदवार पूर्वतयारी करून आलेली एक धून [ट्यून] आणि कोणतेही नोटेशन वाजवण्यासाठी सक्षम असावा.
IAF Agniveervayu Recruitment 2024 – भारतीय वायुसेना अधिकृत वेबसाईट –
https://agnipathvayu.cdac.in/AV/
IAF Agniveervayu Recruitment 2024 – अधिसूचना –
https://agnipathvayu.cdac.in/AV/img/rally/AV_Musician_Rally_01_2025.pdf
वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शारीरिक आणि संगीत परीक्षा घेण्यात येणार आहे.
भारतीय वायुसेनेत अग्निवीरवायू [वादक] पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास १०० रुपये + जीएसटी अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
नोकरीचा अर्ज करताना उमेदवारांनी अर्जात आपली संपूर्ण आणि योग्य माहिती भरावी.
अग्निवीरवायू [वादक] या पदासाठी नोकरीचा अर्ज हा उमेदवारांनी अंतिम तारखेआधी पाठवावा.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही ५ जून २०२४ अशी ठेवण्यात आली आहे.
अग्निवीरवायू [वादक] या नोकरीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी भारतीय वायुसेनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचू शकता. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केलेली आहे.
Join our Telegram Channel
0 टिप्पण्या