मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजना अंतर्गत वेबसाईट पोर्टल जे आहे ते लॉन्च करण्यात आलेला आहे आता तुम्ही वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता अगोदर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर पुन्हा भरायची गरज नाही पण ज्यांनी फॉर्म भरलेला नाही ते आता वेबसाईटवरून सुद्धा फॉर्म भरू शकतात वेबसाईट लॉन्च झालेली आहे ऑनलाईन वेबसाईट वरती फॉर्म कसा भरायचा आहे ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे
तुमचा सुद्धा फॉर्म जो आहे तो अप्रुड होईल तर चला पाहूया ए टू झेड प्रोसेस फॉर्म भरायची कशी आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईट वरती यायचंय लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने हे पोर्टल आहेत वरती तुम्हाला मुख्यपृष्ठ तसेच योजनेची पूर्ण माहिती,आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ही दिलेली आहे तसेच या पोर्टल वरती आतापर्यंत किती अर्ज झाले वगैरे ही सगळी माहिती आहे वरती ते राइट साईडला एक ऑप्शन दिसते तुम्हाला अर्जदार लॉगिन या वर क्लिक करायचं आहे अर्जदार लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर आता इथे आपलं अकाउंट नाहीये त्यामुळे आपल्याला अकाउंट उघडावे लागेल अकाउंट उघडण्यासाठी खाली ऑप्शन आहेत
खाते नाही, खाते तयार करा, म्हणजे साइन अप,
खाते तयार करा वरती क्लिक करायचं आहे तिथे आपल्याला अकाउंट उघडायचे त्याचे फुल नेम अस पर आधार कार्ड वरती नाव आहे तसं इंग्लिश मध्ये त्याच पूर्ण नाव जसं आहे तसं टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर विचारले आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा पासवर्ड एक तयार करायचा आहे तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीने पुन्हा एकदा पासवर्ड पुष्टी करायचे म्हणजे आहे त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा येथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तालुका तुमचा जो असेल तो तालुका सिलेक्ट करायचा त्यांना तुमच्या गावाचं नाव विचारलं जाईल जे गावाचं नाव आहे ते तुम्ही ते सिलेक्ट करा गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर महानगरपालिका आहे का नगरपालिका आहे तर तुमचे जर यामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता जर ग्रामपंचायत जर असेल तर हा ऑप्शन लागू नाही त्यानंतर ऑथोराइड पर्सन आता तुम्ही कोण आहात पहिला ऑप्शन सामान्य महिला
म्हणजे आता तुम्ही कोणत्याही व्यक्तीचा कोणीही फॉर्म भरू शकता जसं आपण ॲप मध्ये पाहिलं तशा सामान्य महिला सीआरपी महिला असेल अंगणवाडी परसेविका असेल तर अंगणवाडी सेविका अशा पद्धतीने जे पर्सन आहे ते सिलेक्ट करायचं समजा सीआरपी सिलेक्ट केला तर त्यांचा जो काहीच नंबर असेल आता अंगणवाडी सेविकास सिलेक्ट केला तरी ते त्यांचं नाव किंवा नंबर इथे टाकायला विचारायला जो काही नंबर असेल आता सेतू सिलेक्ट केलं तर कार्यालयाचे नाव किंवा नंबर नाव सुद्धा टाकू शकता सीएससी आयडी असेल तर टाकू शकता महाऑनलाईन आयडी असेल तर महाऑनलाईन तसेच आवश्यक असतील अशा सेविकांकडे जो आयडी असेल तो खाली तुम्हाला टाकावे लागेल ग्रामसेवक वार्ड अधिकारी अशा प्रकारचे कोणताही व्यक्ती इथे फॉर्म भरू शकतो हे सिलेक्ट करा आणि टम्संग कंडिशन एक्सेप्ट करायचे आहेत केल्यानंतर कॅपच्या टाकायचा आणि खाली साइन अप बटनावरती क्लिक करायचं साइन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि खाली कॅपच्या विचारलाय तो कॅपच्या टाकून वेरिफाय ओटीपी वरती क्लिक करायचं
केल्यानंतर तुम्ही पाहू शकता लॉगिन सक्सेसफुल म्हणजे तुमचा अकाउंट आहे ते आता ओपन झालेला आहे आता आपल्याला लॉगिन करायचा आहे आता आपला जो काही मोबाईल नंबर आहे आणि जो पासवर्ड आहे तो टाकून कॅपच्या विचारला आहे तसे नंबर इथे टाकायचेत आणि खाली लॉगिन बटन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे लॉगिन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता लॉगिन सक्सेसफुली झालेला आहे
आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्यापूर्वी ते काय काय ऑप्शन दिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज योजनेची माहिती यापूर्वी केलेल्या अर्ज अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत यामध्ये आपलं काय काम आहे तर योजनेची जी काही माहिती आहेत कोणकोणती कागदपत्रे लागतात ते वाचून घ्यायचे त्यानंतर यापूर्वी केलेल्या अर्ज जर तुम्ही या पूर्वी अर्ज केले अर्ज करायचा अर्ज करण्यासाठी सोपी पद्धत काय आहे तुम्हाला जो ऑप्शन दिला आहे पहिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तो आता तुम्हाला आधार नंबर ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या महिलेचा इथे आधार नंबर टाकायचा आणि सेंड ओटीपी वरती क्लिक करायचा आहे लक्षात ठेवा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता ज्या महिलेचा आधार कार्ड नंबर टाकलाय त्या महिलेच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल तरच ओटीपी जाणार आहे तरी तुम्ही सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता ओटीपी गेलेला आहे तो ओटीपी टाकायचा आहे आता पाहू शकता इथे ॲटोमॅटिकली आधार कार्ड वरच जे काही नाव आहे ते पूर्ण नाव इथे इंग्लिश मध्ये ऑटोमॅटिकली आलेल्या आहे तुम्हाला इथे काहीही टाकायची गरज लागणार नाही त्यानंतर खाली वडील किंवा पतीचे नाव विचारलं तर आता लग्न झाले असेल तर पती सिलेक्ट करा आणि पतीचे नाव पुढे बॉक्समध्ये पूर्ण टाकून घ्या. लग्न नसेल झालं तर वडील सिलेक्ट करा आणि वडिलांचे नाव पुढे टाकून घ्या त्यानंतर महिलेचे लग्न पूर्वीचे नाव ते पूर्ण टाका लग्न नसेल झालं तर तो ऑप्शन सोडून द्या त्यानंतर खाली विवाहित आहे का अविवाहित आहे घटस्फोटीत आहे निराधार ऑप्शन आहेत त्याच्या महिलेला विचारून तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर जन्मदिनांक सुद्धा ऑटोमॅटिक आलेली आहे त्यानंतर खाली आपला महाराष्ट्रात जन्म झालेला आहे का तर महाराष्ट्रात जन्म झाला असेल तर होय करायचंय महाराष्ट्र जन्म नसेल झाला तर नाही करायचा
आता आधार कार्ड नुसार पत्ता तुम्हाला टाकायचा आहे आज आधार कार्ड वरती जसा पत्ता असेल तर तुम्हाला इथे टाकायचा आहे इथे ऑटोमॅटिकली ऍड्रेस येतो त्याच्यामध्ये एडिट करायचा त्यानंतर पिन कोड सुद्धा ऑटोमॅटिक आलेला आहे पिनकोड व्यवस्थित चेक करायचे आधार कार्ड वरती जी माहिती आहे तीच माहिती टाकायची ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा ऍड्रेस इथे ऑटोमॅटिकली येतो एडिट करायचे असते एडिट करू शकतात पिनकोडे आता खाली जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर आधार कार्ड नुसार तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका इथे निवडा तुमच्या गावाचं जे काही आधार कार्ड नुसार गावाचं नाव आहे ते गावाचं नाव निवडा त्यानंतर महानगरपालिका किंवा नगरपालिका जर तुमच्या इथे महानगरपालिका असेल नगरपरिषद असेल जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता पण जर तुमचं गाव असेल जे की ग्रामपंचायत आहे तर लागू नाही हा पर्याय तुम्ही सिलेक्ट करायचा आहे जर नगरपालिका नगरपरिषद असेल तर तुम्ही सिलेक्ट करा ग्रामपंचायत असेल तर लागू नाही
त्यानंतर मोबाईल नंबर विचारात तर ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताहेत त्या महिलेचाच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का शासनाचे जे काही योजना आहेत ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला काही पैसे भेटत असतील महिन्याला त्या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ भेटत असेल तर होय करा आणि योजनेचे नाव तुम्हाला खाली टाकायला विचारेल आता इथे पहा ज्या योजनेअंतर्गत जर तुम्हाला पैसे भेटत असतील कोणत्याही शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात संजय गांधी असेल किंवा दुसऱ्या तरी ते संजय गांधी मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकत नाही पण जर पीएम किसान असेल किंवा अन्य काही असेल तर त्यांच्यासाठी पहा दर महिन्याला जे रक्कम असेल 500 हजार तर एवढी रक्कम दीड हजार असेल महिन्याला तर तुम्ही लाभ घेऊ शकत नाही आता जर तुम्हाला योजनेअंतर्गत तुम्हाला काहीच मिळत नाही म्हणजे शासनाच्या योजनेत तर कोणतीही पेन्शन वगैरे भेटत नसेल तर फक्त नाही करायचं कोणत्याही योजनेचा मला लाभ मिळत नाही त्यासाठी नाही केला.
त्यानंतर खाली आता अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील द्यायचा म्हणजे बँकेची माहिती द्यायची आहे. बँकेचे पूर्ण नाव इथे टाकायचा आहे जे असेल आता इथे टाकताना सर्व माहिती इंग्लिश मध्ये भरायचे आहे लक्षात ठेवा त्यानंतर बँक धारकाचे नाव आधार कार्ड वरती जसं नाव आहे तसंच नाव तसंच स्पेलिंग व्यवस्थित टाकायचे आहे इंग्लिश मध्ये टाकायचे बँक खाते क्रमांक इंग्लिश मध्ये टाका बँकेचा अकाउंट नंबर टाकल्यानंतर पुन्हा एकदा बँकेचा अकाउंट नंबर त्याची पुष्टी करा आता आयएफसी कोड व्यवस्थित टाका इथे इंग्लिश मध्ये टाकायचा आहे आयएफसी कोड टाकल्यानंतर खाली विचारेल आपलं बँक खाते आधारशी जोडलेला आहे का तर इथे आधार कार्ड ला जोडले नसेल तर लिंक करून घ्या आपल्याला इथे होय करायचा करायचा होय केल्यानंतर
आता कागदपत्र काय आहेत ते समजून घ्या. अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट सर्टिफिकेट नसेल तर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र पाहिजे जन्म प्रमाणपत्र जर नसेल तुमच्याकडे तर शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर तुमच्याकडे पंधरा वर्षांपूर्वीच रेशन कार्ड पाहिजे पंधरा वर्षांपूर्वीच रेशन कार्ड पण नसेल तर पंधरा वर्षांपूर्वीचा मतदान ओळखपत्र पाहिजे तर या पाचपैकी तुमच्याकडे एक कोणतेही कागदपत्र असणे गरजेचे आहे कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे आता पंधरा वर्षांपूर्वीच रेशन कार्ड वर जर पाहिलं तर 2009 च्या अगोदरची तारीख पाहिजे मतदान ओळखपत्र जर अपलोड करत असाल 2009 च्या अगोदरची त्याच्यावरती तारीख पाहिजे तरच तुम्ही अपलोड करा जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आता काढला असेल तरी तुम्हाला चालणार आहे तो अगोदरच्या नावाने असे लग्न पूर्वीचे नाव असतं तर तो सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तो तुम्ही अपलोड करू शकता इथे शाळा सोडल्याचा दाखला महिलेचा अपलोड केलेला आहे वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही काय अपलोड केलेले ते तुम्हाला एकदा दिसेल एकदा चेक करून घ्या चुका करू नका आता दुसरं कागदपत्र आहे तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का तर असेल तर होय करायचं आणि रेशन कार्ड ची जी काही पहिली बाजू आहे ती इथे अपलोड करायची रेशन कार्ड ची पाठीमागची बाजू आहे की इथे आपलं करशील पहिली म्हणजे कोणतं ज्याच्या वरती कुटुंबप्रमुखाचं नाव असतं आणि मागची म्हणजे मागील बाजू म्हणजे कुठली शेवटची ज्यावरती कुटुंबातली सगळी नाव असतात असे दोन्ही भाग जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्र इथे तुम्ही अपलोड करू शकता उत्पन्न प्रमाणपत्र आहे अर्जदार पती आणि महिलेचा दोघांचे नाव उत्पन्न प्रमाणपत्र मध्ये असणं गरजेचं आहे
आता तिसरं कागदपत्र आहे हमीपत्र तीनच कागदपत्र आहे आता मी हमीपत्र अपलोड करतोय तरी ते आपल्याला बटन वरती क्लिक करा आम्ही पत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या हमीपत्र वरती तुमचं नाव आणि सही टाकून अपलोड करा आणि त्यावरती सर्व टीका करायचे आहेत अशा पद्धतीने सर्व टीका करा आणि त्यानंतरच हे अपलोड करा
आणि चौथा काय आहे फोटो आहे पासपोर्ट size फोटो महिलाचा जो काही फोटो आहे तिथे अपलोड करा व्ह्यू वरती क्लिक करून तो फोटो अपलोड झाले का पहा
बाकी कागदपत्र तुम्हाला कोणतेही लागणार नाही हे तीन ते चार कागदपत्र लागणार आहेत आधार कार्ड अपलोड करायची गरज नाही आधार कार्ड ची माहिती ऑटोमॅटिकली घेतलेली आहे आणि तुमचे बँकेचे पासबुक सुद्धा अपलोड करायची गरज नाही कारण आधार कार्ड ने पैसे मिळणार आहे तरी ते सबमिट बटनावरती क्लिक करा तर हे फॉर्म ओपन होईल तुम्ही काय काय माहिती भरलेली एकदा चेक करा सगळी माहिती बरोबर असेल तर खाली कॅप्चर टाका आणि हा जो फॉर्म आहे तो सबमिट करा सबमिट केला की तुमचा फॉर्म जो आहे तो कम्प्लीट झाला एप्लीकेशन पाहू शकता सबमिटेड दाखवतोय एप्लीकेशन सबमिट झाले आहेत
आता यापूर्वी केलेली अर्ज इथे जायचे आपल्याला हा ऑप्शन इथे आल्यानंतर तुम्ही केलेल्या अर्ज तुम्हाला इथे दिसतील जेवढे काही अर्ज तुम्ही करा हे अर्ज तुम्ही कोणीही करू शकता कितीही करू शकता आणि अनलिमिटेड फॉर्म तुम्ही भरू शकता तर अशा पद्धतीने येतात स्टेटस सुद्धा पाहू शकता काय आहे एप्लीकेशन स्टेटस पेंडिंग दाखवत आहे पेंडिंग नंतर ते रिव्ह्यू मध्ये जाईल नंतर जो फॉर्म आहे तो चेक केला जाण्यासाठी डोळ्याच्या आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो फॉर्म भरला आहे तिथे सगळी माहिती तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने फॉर्म भरायचा होता मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
वेबसाइट लिंक - https://ladakibahin.maharashtra.gov.in/
ladakibahin.maharashtra.gov.in :मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजना वेबसाईट पोर्टल ! तुम्ही वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता
Join our Telegram Channel
0 टिप्पण्या