IPL 2024 Final: KKR चा झेंडा खांद्यावर अन् पत्नीची गळाभेट, रोमँटिक झाले नितीश राणा-सांची मारवाह, फोटो व्हायरल

 

IPL 2024 Final: KKR चा झेंडा खांद्यावर अन् पत्नीची गळाभेट, रोमँटिक झाले नितीश राणा-सांची मारवाह, फोटो व्हायरल 

Nitish Rana Romantic with wife Saachi Marwah:आयपीएल २०२४चा अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक मोठमोठे कलाकार तसेच खेळाडूंचे कुटुंबीयही उपस्थित होते. विजयानंतर मैदानात खेळाडूंचे कुटुंबीयही आले होते. यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज नितीश राणा आणि त्याच्या पत्नीचा एक रोमँटिंक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Nitish Rana And Wife Saachi Marwah Romantic photo: चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने १० वर्षांनंतर पुन्हा एकदा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा ८ विकेट्सने सहज पराभव करत मोठा विजय नोंदवला. हा मोठा सामना पाहण्यासाठी अनेक मोठे कलाकार तर आले होते. तर स्टेडियममध्ये खेळाडूंचे कुटुंबीयही उपस्थित होते. कोलकाताने हैदराबादला हरवून आयपीएलचे जेतेपद आपल्या नावे केले त्यानंतर कोलकात्याच्या खेळाडूंशिवाय त्यांचे कुटुंबीयही मैदानात उतरले. यादरम्यान, KKR स्टार आणि अनुभवी फलंदाज नितीश राणाची पत्नी देखील दिसली. नितीश राणा आणि त्याच्या पत्नीचा मैदानावरील एक रोमँटिक फोटो पाहायला मिळत आहे.

फायनल जिंकल्यानंतर केकेआरचा खेळाडू नितीश राणा आणि त्याची पत्नी सांची मारवाह मैदानात दिसले. दोघांनीही खूप रोमँटिक पोजमध्ये फोटो काढला, जो सांचीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नितीश राणाच्या खांद्यावर केकेआरचा झेंडा आहे आणि सांचीने त्याला मिठी मारत हा फोटो काढला आहे. इतकेच नव्हे तर तिने संघातील खेळाडूंसोबत फोटो, व्हीडिओही शेअर केले आहेत. केकेआर कॅम्पमध्ये सांची मारवाह सगळ्यांसोबत खेळीमेळीच्या वातावरणासह मजा मस्ती करताना दिसली. सांची आणि नितीश राणा यांचे रिंकूसोबतच नात खूप जवळचं आहे. सांचीला रिंकू दीदी म्हणतो, तर आयपीएल व्यतिरिक्तही हे तिघे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. जेतेपद पटकावल्यानंतर सांचीने रिंकूसोबतचा एक गोड फोटोही शेअर केला आहे.
नितीश राणाच्या पत्नीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये रिंकू सिंग ब्लॉग शूट करताना दिसत आहे, ज्याचा एक मजेशीर व्हीडिओही तिने शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये केकेआरचे काही खेळाडू सांची, नितीशही होते. संघातील खेळाडूंसोबचा सेल्फीही तिने पोस्ट केला. सांचीने केकेआरला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या श्रेयस अय्यरची बहीण आणि श्रेयसची गर्लफ्रेंड असल्याची अफवा असलेली त्रिशा कुलकर्णी यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला. पण या फोटोदरम्यान सांची आणि नितीशचा रोमँटिक फोटो खूपच व्हायरल होत आहे.



 हेही वाचा- Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी! आजच अर्ज करा, जाणून घ्या सविस्तर माहिती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu