porsche accident pune: पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनंतर बार मालकासह मॅनेजरलाही अटक

 


Maharashtra News Live : पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनंतर बार मालकासह मॅनेजरलाही अटक 

Marathi News Live Today : 

 पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन भागात झालेल्या अपघात प्रकरणी पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. हा विषयसुद्धा दिवसभर चर्चे राहण्याची शक्यता आहे.

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनंतर बार मालकासह मॅनेजरला अटक

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी आता पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनंतर आता बार मालकासह मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. आरोपी १७ वर्षांचा अल्पवयीन असताना त्याला दारु देण्यात आली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.



दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी - विजय वडेट्टीवर

पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारू पित असल्याचे CCTV फुटेज असूनही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली?

रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली?

नियम डावलून बार आणि पब सुरू होते का?

होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही?

या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे. आरोपी अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला? त्यामुले या घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी दिली.

...अन्यथा पुण्यातील लोकं रस्त्यावर येतील; संजय राऊतांचा इशारा

पुणे कार अपघात प्रकरणी पोलीस आयुक्तांना निलंबित केले पाहिजे. त्यांनी आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. एका तरुण जोडप्याचा मृत्यू होतो आणि आरोपीला २ तासांत जामीन मंजूर होते. हे कसं शक्य आहे? तो नशेत होता, त्याचे व्हिडीओसुद्धा बाहेर आले आहेत. मग त्याचा मेडीकल रिपोर्ट निगेटिव्ह कसा आला? याची उत्तर पोलीस आयुक्तांनी द्यावी. पुणे पोलीस आयुक्तांना लवकरात लवकर निलंबित करावे, अन्यथा पुण्यातील लोकं रस्त्यावर येतील, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.






 हेही वाचा- Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी! आजच अर्ज करा, जाणून घ्या सविस्तर माहिती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu