BJP wins Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची हॅट्ट्रीक, तर सिक्कीममध्येही एसकेएमने राखला गड

 



Arunachal Pradesh Sikkim Assembly Election Result 2024 Live : अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील मतमोजणीचे अपडेट्स जाणून घ्या.

Sikkim and Arunachal Pradesh Assembly Election Results 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकींच्या निकालाआधी देशात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आज रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या ईशान्येकडील राज्यांमधील विधानसबा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होतील.

१९ एप्रिल रोजी सिक्कीममध्ये ३२ विधानसभा जागांसाठी एकाचवेळी मतदान झाले. सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यात लढत होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत एसकेएमने १७ जागा जिंकल्या होत्या, तर एसडीएफला १५ जागा मिळाल्या होत्या एक्झिट पोलनुसार राज्यात एसकेएम पुन्हा सत्तेत येणार असल्याची शक्यता आहे.






 Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी! आजच अर्ज करा, जाणून घ्या सविस्तर माहिती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu