मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे? ते पाहूया महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मुली व महिलांना दरमहा 1500 रू दिले जाणार आहेत. तर ही मदत महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी दिले जाणार आहे. तर महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण” योजना सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात नवीन सुरू झालेली योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यकत्या आणि निराधार महिला लाभार्थी राहणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता काय आहे? त्याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.
माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
1. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
2. लाभार्थ्याचे आधार कार्ड.
3. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला
4. कुटुंबाचा उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे)
5. बँक खाते पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
6. पासपोर्ट साईज फोटो.
7. रेशन कार्ड.
8. सदर योजनेच्या अटी व शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी योजनेचे पोर्टल तयार केले जाईल. तसेच मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल अशा महिला ग्रामपंचायती सेतू केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून अर्जाची पोचपावती दिली जाईल.
तसेच अर्जदार महिलेला फॉर्म भरत्यावेळी स्वतः हजर राहावे लागेल. कारण महिलेचा फोटो काढण्यात येईल तसेच ही केवायसी करण्यात येईल. यासाठी महिलेने खालील आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी.
1. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशन कार्ड)
2. स्वतःचे आधार कार्ड
मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी वयाची अट काय आहे? पाहूया तर महिला व मुलींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वयाची अट देण्यात आलेली आहे. तर अर्जदार महिलेचे वय अर्ज करता वेळी कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर अशा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकता.
तर लाडली बहण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ते पाहूया. तर 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. या निर्णयात दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे. तसेच शासनाने वेळोवेळी तारखेत जर का बदल केला तर त्याबाबतची माहिती आपल्या वेबसाईट वरती अपडेट करण्यात येईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना PDF form कुठे मिळेल. पहा तर माझी लाडकी बहिण योजनेसाठी कुठल्याही प्रकारचा कागदाचा फार्म भरण्याची गरज नाही. अर्जदारांना फक्त आवश्यक असलेले कागदपत्रे लागेल. त्यानंतर या योजनेसाठी फार्मा ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येईल. फार्म भरून झाल्यावर तुम्हाला त्याची पोचपावती देण्यात येईल. त्यामुळे अर्जदारांना फार्म घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 महाराष्ट्र अधिकृत शासन निर्णय (GR) PDF Download करण्यासाठी खाली उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही योजनेबद्दल अधिकृत सविस्तर माहिती GR PDF मध्ये पाहू शकता.
| GR Download | |
| Download |
Join our Telegram Channel
0 टिप्पण्या