लेक लाडकी योजना 2024 पात्रता व नियम | Lek Ladaki Yojana 2024 Eligibility Criteria
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय आहे? या योजनेसाठी कोण फार्म किंवा अर्ज करू शकतो. लेक लाडली योजनेसाठी कोणकोणते नियम व अटी आहेत अशी संपूर्ण माहिती पाहूया.
1) Maharashtra Lek Ladki Scheme साठी पात्र असण्यासाठी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
2) ज्या मुलींचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झाला असेल. त्याच मुली या योजनेसाठी पात्र राहतील.
3) लेक लाडकी योजना 2024 फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे.
4) महाराष्ट्र बाहेरील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
5) राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र राहतील.
6) या योजनेसाठी लाभार्थी मुलीचे बँक खाते उघडणे आवश्यक राहील.
7) लेक लाडकी योजनेचा लाभ मुलगी 18 वर्ष होईपर्यंतच मिळेल.
लेक लाडकी योजना कागदपत्रे|Lek Ladki Yojana Documents List in Marathi
लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत. याची यादी लिस्ट खाली देण्यात आली आहे. परंतु अजून अधिकृतपणे कोण कोणते आवश्यक कागदपत्रे लागतील अशी माहिती समोर आलेली नाही. तरी सुकन्या समृद्धी योजनेनुसार पाहायला गेलं तर खालील प्रमाणे डॉक्युमेंट लागू शकता. तरी शासन नियमानुसार आवश्यक असलेले कागदपत्रांची यादी आल्यानंतर माहिती अपडेट करण्यात येईल.
लेक लाडकी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
1) लाभार्थी चा जन्म दाखला.
2) उत्पन्न दाखला ( वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा जास्त नसावे)
3) लाभार्थीचे आधार कार्ड
4) पालकांचे आधार कार्ड
5) बँक पासबुक
6) रेशन कार्ड (पिवळे किंवा केसरी)
7) मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
8) संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)
9) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
10) अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र)
लेक लाडकी योजना नोंदणी कशी करायची | Lek Ladaki Yojana Registration
Lek ladaki yojana registration process – महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे? हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहे. परंतु लेक लाडकी योजनेसाठी नोंदणी कशी करायची? याबद्दल अधिकृत माहिती शासनाने जारी केलेली नाही. कारण या योजनेसाठी कोणत्याही प्रकारची online नोंदणी करायची नाहीये. लेक लाडकी योजनेसाठी Offline पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे यासाठी कोणत्याही प्रकारची Online Registration Process नाहीये.
लेक लाडकी योजना 2024 फॉर्म कसा भरायचा | Lek Ladki Yojana Online Form Process 2024
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?, ते पाहणार आहोत. जर तुम्हाला लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करायचा असेल. तर हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. म्हणजेच या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचा ऑनलाइन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाहीये.
ज्याही पालकांना त्यांच्या मुलीसाठी lek ladaki yojana form भरायचा असेल. तर त्यांना त्यांच्या जवळच्या अंगणवाडी मध्ये, किंवा गावातील अंगणवाडी सेविकेकडे हा अर्ज भरायचा आहे. या अर्जाची pdf खाली डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तरी पात्र असलेल्या मुलींचे पालक खाली देण्यात आलेला Form Download करून त्याला भरून अंगणवाडी सेविकेकडे जमा करू शकता. तर याच पद्धतीने हा फॉर्म प्रत्येकाला भरायचा आहे.
लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?. Lek Ladaki Yojana Form PDF
0 टिप्पण्या