Virat Kohli Video: विजयी मिरवणुकीदरम्यान ‘ते’ दृश्य पाहून भारतीय क्रिकेटपटूंना बसला धक्का; विराटनं रोहितला सांगितलं आणि…

 


भारतीय क्रिकेटपटू गुरुवारी मुंबईत आल्यानंतर मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली.भारताच्या जगज्जेत्या क्रिकेट संघाचं गुरुवारी संध्याकाळी मुंबईत जल्लोषात स्वागत झालं. मरीन ड्राईव्हवर आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं क्रिकेट चाहते जमा झाले होते. मरीन लाईन्स ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ही विजयी रॅली काढण्यात आली. यावेळी ओपन डेकच्या बसमधून भारतीय क्रिकेटपटूंनी चाहत्यांच्या शुभेच्छांचा मनमुरादपणे स्वीकार केला. त्यांना अभिवादन केलं. पण यावेळी घडलेल्या एका प्रसंगामुळे काही क्षण का होईना, भारतीय क्रिकेटपटू घाबरले. विराटनं लागलीच रोहितला ही बाब लक्षात आणून दिली आणि रोहितनं त्यावर पुढाकार घेतला.


काय घडलं विजयी रॅलीमध्ये?

गुरुवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास टीम इंडिया विश्वचषकासह दिल्लीहून मुंबईत दाखल झाली. मुंबई विमानतळावरून ते मरीन ड्राईव्हवर पोहोचले. तिथून वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी रॅली काढण्यात आली. वानखेडे स्टेडियमवर भारतीय क्रिकेटपटूंचा मोठा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी क्रिकेटपटू विजयी रॅलीमध्ये ओपन डेक बसमधून निघाले. काही अंतरावर जाताच बाजूला दिसलेल्या एका दृश्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना काही क्षण धक्का बसला.

यानंतर मुंबईकर रोहित शर्मानं आपल्या स्टाईलमध्ये त्या चाहत्याला झाडावरून खाली उतरायला सांगितलं. त्यापाठोपाठ इतरही क्रिकेटपटूंनी त्या चाहत्याला खाली उतरायला सांगितलं. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनीही त्यावर सोशल मीडियावर सूचक पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई पोलिसांचं आवाहन

दरम्यान, मुंबई पोलिसांनी यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये सूचक शब्दांत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. फोटो काढण्यासाठी क्रिकेट चाहत्याने केलेल्या मेहनतीसंदर्भात “या मेहनतीचे फळ घातक ठरू शकते” असं पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. “भारतीय क्रिकेट संघाविषयी असलेले प्रेम आम्ही समजू शकतो, पण ते असे व्यक्त करणे धोक्याचे ठरू शकते”, असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

BECIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे होणाऱ्या भरती आणि अर्जाबद्दल अधिक माहिती पाहा.

TMC Recruitment 2024 : मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी! आजच अर्ज करा, जाणून घ्या सविस्तर माहिती

Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेमध्ये होणार मोठी भरती! पाहा अधिक माहिती

Maharashtra State gov job महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत नोकरीची संधी: महाराष्ट्र शासनातील संधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu