CIFE Mumbai recruitment 2024 : मुंबईतील ICAR – सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन अंतर्गत विविध पदांवर भरती होणार आहे. या भरतीमध्ये नेमक्या कोणत्या आणि किती रिक्त जागांवर भरती होणार आहे, याची माहिती इच्छुक उमेदवारांनी पाहावी. तसेच या पदावर नोकरीचा अर्ज करण्यासाठी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता आणि अर्जाची अंतिम तारीख याबद्दल जाणून घ्या.
ICAR – सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन अंतर्गत खालील पदांसाठी भरती करण्यात येणार आहे –
मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी एकूण २६ जागा रिक्त आहेत.
असिस्टंट या पदासाठी एकूण १९ जागा रिक्त आहेत.
अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी एकूण दोन जागा रिक्त आहेत.
लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी एकूण सात जागा रिक्त आहेत.
अशा एकूण ५४ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहावीपर्यंतचे शिक्षण असणे आवश्यक आहे.
लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील बारावीपर्यंतचे शिक्षण असणे आवश्यक आहे.
असिस्टंट आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ICAR च्या नियमांनुसार शिक्षण असणे आवश्यक आहे. या पदासंबंधी शैक्षणिक पात्रतेची माहिती नोकरीच्या अधिसूचनेत वाचावी.
मल्टी टास्किंग स्टाफ या पदावर निवड झालेल्या उमेदवारास २०, २००/- रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.
असिस्टंट या पदावर निवड झालेल्या उमेदवारास ३४,८००/- रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.
अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदावर निवड झालेल्या उमेदवारास २०,२००/- रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.
लोअर डिव्हिजन क्लर्क या पदावर निवड झालेल्या उमेदवारास २०,२००/- रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.
हेही वाचा : NCB Recruitment 2024 : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती
CIFE Mumbai recruitment 2024 – ICAR – सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन अधिकृत वेबसाइट लिंक
https://www.cife.edu.in/
CIFE Mumbai recruitment 2024 – अधिसूचना लिंक
https://www.cife.edu.in/pdf/office-order/Circular%20-%20Administrative%20Posts–27-5-2024.pdf
वरील कोणत्याही पदांसाठी नोकरीचा अर्ज पाठवण्यास उमेदवार इच्छुक असल्यास त्यांनी तो ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
नोकरीचा अर्ज भरताना उमेदवारांनी आपली संपूर्ण आणि अचूक माहिती अर्जात भरायची आहे.
अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असल्याने उमेदवारांनी तो खालील पत्त्यावर पाठवावा –
अर्जाचा पत्ता – के. एल. मीना, मुख्य प्रशासन अधिकारी, ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई.
उमेदवारांनी नोकरीचे अर्ज हे अंतिम तारखेआधी पाठवणे अनिवार्य आहे.
नोकरीचा अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही २१ जून २०२४ अशी आहे.
वरील नोकरीसंबंधी उमेदवारांस अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी ICAR – सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केलेली आहे.
Join our Telegram Channel
0 टिप्पण्या