Pune Porsche Accident: विभाग प्रमुख असलेल्या अजय तावरे यांनी ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकला होता असं हळनोर यांनी सांगितलं आहे. डॉ. तावरे आणि अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचं बोलणं झाल्याची माहिती देखील हळनोर यांनी दिली आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अनेक मोठे खुलासे समोर येत आहेत. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीवेळी मोठी माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी डॉ. हळनोर यांनी चौकशीदरम्यान मोठी माहिती दिली आहे.
विभाग प्रमुख असलेल्या अजय तावरे यांनी ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकला होता असं हळनोर यांनी सांगितलं आहे. डॉ. तावरे आणि अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचं बोलणं झाल्याची माहिती देखील हळनोर यांनी दिली आहे. ब्लड सॅम्पल बदलणं माझ्या मनाला पटलं नव्हतं असंही त्यांनी म्हटलं आहे. माझ्याकडून मोठी चूक झाल्याचं मला वाटतं होतं असंही त्यांनी म्हटलं आहे.
प्रकरणात अटकेत असलेल्या दोन डॉक्टरांची आणि एका शिपायाची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीवेळी हळनोर यांनी आपण मोठी चूक केल्याचं कबूल केलं आहे. तर माझ्यावर हे कृत्य करण्यासाठी माझ्या वरिष्ठांनी दबाव टाकला असं म्हटलं आहे. या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे खुलासे समोर येऊ शकतात.
पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन डॉक्टरांवर कारवाई केली आहे. ससुनचे डॉ अजय तावरे व डॉ श्रीहरी हळलोर यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली.
आरोपीचा ब्लड रिपोर्ट सुरुवातीपासून चर्चेत आहे. पोलिसांना ब्लड रिपोर्टबाबत माध्यमांनी देखील अनेक प्रश्न विचारले आहेत. आरोपीने मद्य प्राशन केले होती की नाही, हे ब्लड रिपोर्टमधून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हा ब्लड रिपोर्ट महत्वाचा आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ब्लड रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याच्या आरोपाखाली ससून जनरल हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
Join our Telegram Channel
0 टिप्पण्या